पुणे

ब्रेकिंग| सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मुंबईतील विधानभवनात पोहोचल्या आहेत. दरम्यान मंगळवारी 25 जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी आज (दि.१३ जून) विधानभवनात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या संदर्भातील वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा बारामतीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाला होता.

सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली सर्व राजकीय ताकद पणाला लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच महायुतीमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी कामाला लावले होते. मागील लोकसभा निवडणुकीतील भाजपा उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या संखेत राष्ट्रवादी काँग्रेसची मते मिळवल्यास सुनेत्रा यांचा विजय सहज होईल, अशी अटकळ बांधण्यात आली होती, मात्र सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाला.

लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे हर्षवर्धन पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्याशीही अजित पवार यांनी जुळवून घेतले होते. अशा परिस्थितीतही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्कादायक मानला जात आहे. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना राजकीय टक्कर घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवरची नियुक्ती केली जाणार असल्याचे मानले जात आहे.

SCROLL FOR NEXT