पुणे

3 वर्षांच्या मुलीवर यशस्वी हृदय प्रत्यारोपण

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी येथील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 13 वर्षाच्या मुलीवर यशस्वी हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. या रुग्णाला कार्डिओजेनिक शॉक लागल्याने तिचे हृदय निकामी होऊ लागले होते. 3 वर्षांपूर्वी एका शहरातील रुग्णालयात हृदयाची झडप बदलण्याची शस्त्रक्रिया झाली होती. प्रकृती अधिकच बिघडत असल्याने आणि आरोग्याची स्थिती संवेदनशील बनत असल्याने, तिला डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी येथील तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे सुचवले.

ती 2 वर्षांपासून अवयव प्राप्तीच्या प्रतीक्षा यादीमध्ये होती. अवयव मिळाल्यानंतर तिला 2 सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 3 सप्टेंबर 2023 रोजी प्रत्यारोपण करण्यात आले. याअगोदर ही रुग्णाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची झाली होती. हृदय हे स्तनाच्या हाडाच्या मागच्या बाजूला अडकलेले होते. त्यामुळे हा अवयव काढण्यासाठी डॉक्टरांना 3 तास लागले. अवयव आकाराने समान असल्याने रुग्णाला ते जुळून येण्यास मदत झाली आणि चांगला प्रतिसाद दिला. शस्त्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 10 तास लागले. 18 दिवस निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर 20 सप्टेंबर रोजी तिला घरी सोडण्यात आले.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र- कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील म्हणाल्या की, अशी गुंतागुंतीची आणि कठीण शस्त्रक्रिया करून मुलीचा जीव वाचवल्याबद्दल मी सर्व सहभागी तज्ञ डॉक्टरांचे अभिनंदन करते. विद्यापीठाचे विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील म्हणाले की, प्रगत आरोग्य सुविधा या मौल्यवान जीव वाचवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि एक वैद्यकीय संस्था म्हणून आम्ही आमच्या नागरिकांच्या हितासाठी त्या प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. आमच्या उपचार पद्धतीवर विश्वास ठेवल्याबद्दल रुग्णाच्या कुटुंबाचे मी आभार व्यक्त करतो.

प्रत्यारोपण तज्ज्ञांची महत्त्वपूर्ण भूमिका

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनीषा करमरकर म्हणाल्या की, आमच्या सक्षम अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञांनी गुंतागुंतीच्या आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण विभागाचे संचालक डॉ. संदीप अट्टावार म्हणाले की, हे प्रकरण जगातील असंख्य मुलांपैकी एक आहे. यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे, त्यामुळे हृदयक्रिया बंद पडल्यावर औषधे किंवा उपकरण उपचारांना रुग्ण साथ देणे कठीण असते. या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये यशस्वी हृदय प्रत्यारोपण करणे हे एक उत्सव साजरा करण्यासारखे आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT