धर्मादाय आयुक्त समिती आणि मातामृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सादर न झाल्याने आश्चर्य  Pudhari
पुणे

धर्मादाय रुग्णालयांचे ऑडिट रिपोर्ट जनतेसमोर सादर करा; आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची मागणी

'रुग्णालयांसाठी कडक नियमावली निर्माण करावी'

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारी घटना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दिसून आली. अशा सर्व धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारित असलेल्या रुग्णालयांचे ऑडिट रिपोर्ट जनतेसमोर मांडावा आणि अशा रुग्णालयांसाठी कडक नियमावली तयार करावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे डॉ. अविनाश साकुंडे, बाळासाहेब मोडक, रमेश क्षीरसागर आणि राज रजपुत यांनी पत्रकार परिषदेत केली.

याबाबत डॉ. साकुंडे म्हणाले, मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या घटनेमुळे अनेक बाबी समोर आल्या आहेत. वास्तविक पाहता सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये रुग्णांना अपेक्षित सहकार्य आणि उपचार मिळत नाहीत.

अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी सदर घटनेची चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ससूनसारख्या शासकीय रुग्णालयात आणखीन चांगल्या सुधारणा कराव्यात. तसेच, लाडकी बहीण योजनेसारखीच राज्यातील प्रत्येक नागरिकांना 10 लाख रुपये विमा मोफत स्वरूपात देण्यात यावा, अशी मागणी ही त्यांनी या वेळी केली.

डॉक्टरांवर गुन्हा दाखल व्हावा : भिसे कुटुंबीय

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. डॉ. धनंजय केळकर, डॉ. सुश्रुत घैसास आणि सचिन व्यवहारे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी आमची मागणी आहे, असे भिसे कुटुंबातील सदस्य अक्षय पाटे यांनी सांगितले.

हॉस्पिटलवर आणि डॉक्टरांवर कडक कारवाई होत नाही, तोवर आमचा लढा थांबणार नाही. सीसीटीव्ही आणि सीडीआर रिपोर्टमधून सर्व सत्य बाहेर येईल. रुग्णालयावर आणि डॉक्टरांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. रुग्णालयाचा परवाना रद्द व्हायला हवा. पोलिसांनी आमची तक्रार दाखल करून घ्यावी आणि डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही अक्षय पाटे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT