1971 च्या भारतीय विजयासंदर्भातील आठवणी जागविणाऱ्या छायािचत्रांच्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना माहितीदेताना लष्करातील अधिकारी. 
पुणे

पुणे : छायाचित्र प्रदर्शनातून 1971 मधील विजयाच्या आठवणींना उजाळा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्वर्णिम विजय दिनानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनात 1971च्या लढ्यातील आठवणींना पुण्यात उजाळा देण्यात आला. यावेळी सीडीएस जनरल बिपिन रावत यांनाही शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.

कारगिल युद्धातील महावीर चक्र विजेते दिगेंद्र कुमार यांची उपस्थिती

अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या वतीने स्वर्णीम विजय दिवसाचे औचित्य साधून म्हात्रे पुलाजवळील सिद्धी गार्डन येथे युद्धातील दुर्मिळ छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन गुरुवारी भरविण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कारगिल युद्धातील महावीर चक्र विजेते निवृत्त नाईक दिगेंद्र कुमार उपस्थित होते. यावेळी आयोजक योगेश गोगावले, गिरिश खत्री, प्रसन्न जगताप व अन्य उपस्थित होते. यावेळी दिगेंद्र कुमार यांनी सीडीएस रावत यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर, त्यांनी कारगील येथे झालेल्या 'ऑपरेशन विजय'च्या आठवणींना उजाळा दिला.

महावीरचक्र विजेते नाईक (निवृत्त) दिगेंद्र कुमार

या छायाचित्र प्रदर्शनात कारगिल, सियाचिन ग्लेशियर, श्रीलंका, बसंतर, श्रीनगर, खेम करण सेक्टर, लडाख, टिटवाल जम्मू-काश्मीर सेक्टर, अखुरा बांगलादेश, राजुरी जम्मू काश्मीर या युद्धातील प्रमुख यांच्या छायाचित्रासोबतच पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यापुढे पत्करलेली शरणागती, 17 डिसेंबर 1971 साली बांगलादेश सारख्या नवीन राष्ट्राची निर्मिती झाल्याची माहिती सांगणारे वृत्त पत्राची कात्रणे, शरणागतीनंतर पाकिस्तानी सैन्याचे भारतीय सैन्याने ताब्यात घेतलेले रणगाडे, शकरगडच्या विजयी लढाईचे नेतृत्व करताना कर्नल हनुत सिंग, लोंगेवाला येथे पाकिस्तानी रन गाड्यांचे कबरस्तान बनवणारे 23 पंजाब रेजिमेंटचे मेजर कुलदीप सिंह चाँदपुरी, यांसारख्या विविध दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन येथे करण्यात आले आहे.

प्रदर्शनातील काही लक्ष्यवेधी छायाचित्रे

भारताच्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयाची नोंद त्याकाळी जागतिक पातळीवरील वृत्तपत्रांनी घेतली.
जन. सॅम माणिक शॉ गुरखा जवानांना प्रोत्साहन देताना
लोंगेवालाच्या लढाईत भारतीय जवानांनी पाकिस्तानी रणगाड्यांचे कब्रस्तान खोदले
हिली येथील विजय साजरा करताना जवान
पाकिस्तानी सैन्याकडून रनगाडे ताब्यात घेताना भरतीय जवान तर दुसऱ्या छायाचित्रात पाकिस्तानी जन नियाझी यांना शरणागती पत्करण्यासाठी नेताना भारतीय जवान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT