वाकड : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवडमधील वाकड पोलिस स्टेशन शेजारी फ्लेक्स बोर्ड सांगाड्यांमध्ये पतंगाच्या मांजामध्ये कबूतर अडकल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचा प्रसंग घडला.
अडकलेल्या कबुतराची सुटका करण्याण्यासाठी महानगरपालिका अग्निशमन दलाची गाडी व क्रेन घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कबुतराचा जीव वाचला पण, या कार्यवाहीवेळी काही काळ वाहतुकीची कोंडी झाली.