पुणे

पुणे : अडीच महिन्यांत 300 मांजरांची नसबंदी; पालिका भवनातील सात मांजरांचा समावेश

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने भटक्या माजरांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे काम सुरू केले आहे. त्याची सुरुवात महापालिका भवनातील मांजरांपासून करण्यात आली असून, अडीच महिन्यांत तीनशे मांजरांची नसबंदी करण्यात आली आहे. शहरातील भटक्या कुर्त्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कुर्त्यांची नसबंदी केली जाते. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून विविध संस्थांना नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासोबतच पकडलेल्या ठिकाणीच कुत्र्याला सोडण्याचे काम दिले जाते. याच धर्तीवर शहरातील भटक्या मांजरांची नसबंदी करून त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचे नियोजन पालिकेच्या आरोग्य विभागाने हाती घेतले आहे.

भारतीय जीवजंतू कल्याण मंडळाची (एडब्ल्यूबीआय) मान्यता असलेल्या खासगी संस्थेने स्वतःच्या किंवा भाड्याच्या जागेत मांजरांसाठी पायाभूत सुविधा उभारणे, शहरातील भटक्या व मोकाट मांजरांना पकडून त्यांना स्वतःच्या वाहनातून नेऊन नसबंदीची शस्त्रक्रिया करणे, त्यांना अँटिरेबिज लस देणे आणि टॅग लावून मांजरांना पकडलेल्या ठिकाणी सोडणे आदी कामासाठी महापालिकेने सप्टेंबरमध्ये निविदा प्रक्रिया राबवून संस्थेची नियुक्ती केली आहे.

या संस्थेने अडीच महिन्यांत शहरातील 300 पेक्षा अधिक मांजरांची नसबंदी शस्त्रक्रिया केल्याची माहिती महापालिकेच्या प्रभारी मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेची सुरुवात महापालिका भवनातील सात मांजरांची नसबंदी शस्त्रक्रिया करून करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT