पिंपरी (पुणे) : बांधकाम साइटवर जाणार्या वाहनांमधून स्टील चोरणार्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपींकडून 18 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने लिंब फाटा, तळेगाव दाभाडे येथे ही कारवाई केली.
निजाम नवाब खान (58, रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. बैंगणवाडी, गंवडी, मुंबई), शत्रुघन महाबल ठाकुर (60, रा. सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे, मूळ रा. पुराबजार, ता. सदर, जि. आयोध्या, उत्तरप्रदेश), इसराल अहमद आबेदअली शेख (32, रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. बैराहपुर, ता. फतेपुर, उत्तरप्रदेश), महंमद आरीफखान (40, रा. धारावी, मुंबई. मूळ रा. उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांना माहिती मिळाली की, जुना पुणे मुंबई महामार्गावर लिंबफाटा, तळेगाव दाभाडे येथे काहीजण ट्रकमधून स्टील काढून घेत आहेत. त्यानुसार, पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन लाख 78 हजार 600 रुपये किमतीचे 6310 किलो वजनाचे लोखंडी सळईचे बंडल आणि 15 लाख रुपये किमतीचा ट्रक असा जप्त करण्यात आला आहे.