पुणे

हडपसर : लोकसहभागातून सहकाराला बळ; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

अमृता चौगुले

हडपसर; पुढारी वृत्तसेवा : 'लोकसहभागातून सहकार चळवळ भक्कम होते. दूरदृष्टी विचारांचे यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक व सहकार क्षेत्रात पाय रोवून असलेले शरद पवार हे राज्याला मिळालेले वैभव आहे. सन्मित्र बँकेने समाजातील अनेक गरजू व्यक्तींना अर्थसाह्य केल्याने त्यांनी आज उद्योग क्षेत्रात यश मिळविले असून, बँकेची हीच मोठी ओळख आहे,' असे मत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

हडपसर येथील सन्मित्र सहकारी बँकेच्या नवीन प्रशासकीय मुख्य कार्यालयाचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. आमदार चेतन तुपे, संजय जगताप, बँकेचे मार्गदर्शक व माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार उल्हास पवार, जगन्नाथ शेवाळे, बँकेचे अध्यक्ष सुनील गायकवाड, उपाध्यक्ष भरतलाल धर्मावत, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास आदमाने, संचालक यशवंत साळुंखे, चंद्रकांत ससाणे, सुदाम जांभुळकर, जयसिंग गोंधळे, संजय शेवाळे, रमेश काकडे, लक्ष्मण कोद्रे, दिलीप टकले, संभाजी हाके, प्रशांत तुपे, अभिजित शिवरकर, रेश्मा हिंगणे, शुभांगी कोद्रे, सुनील होले, अ‍ॅड. विजय राऊत, अ‍ॅड. चेतन शेवाळे आदी उपस्थित होते.

आमदार तुपे म्हणाले, 'सहकार क्षेत्रामुळे सर्वसामान्यांना अर्थसाह्य झाल्याने त्यांचे जीवनमान बदलले आहे. सन्मित्र बँक व साधना बँक हडपसर परिसरातील उद्योग व्यवसायांना चालना देण्याचे कार्य कारत आहेत.' शिवरकर म्हणाले, 'सर्वसामान्यांचे हित जपण्याचा प्रयत्न कायमच बँकेकडून सुरू आहे. कारभार पारदर्शक असल्याने बँकेची वाटचाल यशस्वीच्या शिखराकडे सुरू आहे.' सूत्रसंचालन गणेश फुलारे यांनी केले.

बँकेने प्रतिकूल परिस्थितीतून प्रगतीकडे वाटचाल केली आहे. संस्थेला दोन कोटींचा नफा झाला असून, कर्ज वसुलीही उत्तम आहे. बँकेला आतापर्यंत विविध क्षेत्रातील 18 पुरस्कार मिळाले आहेत.

                              -सुनील गायकवाड, अध्यक्ष, सन्मित्र सहकारी बँक

SCROLL FOR NEXT