पुणे : पूना हॉस्पिटलचे रसीकलाल एम. धारीवाल सेंटर फॉर कार्डिअॅक अॅण्ड न्यूरो सायन्समध्ये अद्ययावत कॅथलॅब सुरू करण्यात आली आहे. या कॅथलॅबमध्ये अँजिओग्राफी करण्यासाठी फिलिप्स झुरिऑन 7 हे अत्याधुनिक मशीन बसवण्यात आले आहे. पूना हॉस्पिटलचे अध्यक्ष देवीचंदजी जैन, मॅनेजिंग ट्रस्टी राजकुमार चोरडिया, जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी पुरोषोत्तम लोहिया व विश्वस्त राजेश शहा यांनी याविषयी माहिती देतांना सांगितले की संस्थेने आपली रुग्णांकरता अत्याधुनिक श्रेणीतील प्रगत तंत्रज्ञान उपल्ब्ध करण्याची परंपरा कायम राखली आहे .
जागतिक दर्जाच्या या कॅथलॅबमध्ये हृदय व रक्त वाहिन्यांची प्रतिमा स्पष्ट दिसत असल्याने हृदय विकार, मस्तिष्कविकार व रक्तवाहिन्यांचे आजार यांचे अचूक निदान होते. या लॅबच्या टचस्क्रिन मोड्युल आणि फ्लेक्स व्हिजन सुविधांमुळे डॉक्टरांना योग्य उपचारा संबंधी त्वरित निर्णय घेणे सोपे जाते . या कॅथलॅबमुळे रुग्णास तसेच डॉक्टर व टेक्निकल स्टाफ यांना होणार्या विकिरणांचे प्रमाण अतिशय कमी आहे.