पुणे: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मागील आर्थिक 2023-24 मध्ये सुमारे 615 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमविला होता. आता त्यापेक्षा अधिक म्हणजे वर्ष 2024-25 मध्ये दिनांक 31 मार्च 2025 अखेर 651 कोटीचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामध्ये शासनाकडून थकहमीपोटी प्राप्त झालेल्या कोणत्याही रकमांचा समावेश नाही.
बँकेने मिळविलेला भरीव नफ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शिफारस केलेल्या 10 टक्के लाभांशास सभेने बहुमताने मान्यता दिली असून सलग 11 व्यांदा हा लाभांश सभासदांसाठी जाहीर करण्यात आला आहे. (Latest Pune News)
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची 114 वी वार्षकि सर्वसाधारण सभा बँकेच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयातील सहकार सभागृहात गुरुवारी (दि.25) बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत देशातील राज्य व जिल्हा बँकांमध्ये सर्व प्रथम यूपीआय अक्वॉयर व अर्ली वॉर्निंग सिग्नल सिस्टीम बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते सभेत कार्यान्वित करण्यात आली.
राज्य बँक यूपीआय अक्वॉयरर गो लाईव्ह झाली असून, बँकेस स्वत:चा ऽाीललरपज्ञ हा हॅन्डल प्राप्त झाला आहे. ही सेवा राज्यातील जिल्हा बँका व अर्बन बँकांना देण्यात येणार आहे. अर्ली वॉर्निंग सिग्नल सिस्टीम सुरू करण्यात आली असून, यामुळे कर्ज खात्यावर नियंत्रण ठेवणे व खात्यावरील संभाव्य गैरव्यवहार टाळण्यास मदत होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
राज्य सहकारी बँकेची आर्थिक स्थिती: दिनांक 31 मार्च 2025 अखेर
बँकेचा स्वनिधी 7 हजार 706 कोटी रुपये.
सी.आर.ए.आर. हे रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार किमान 9 टक्के राखणे आवश्यक असून, बँकेने हे प्रमाण 17.61 टक्क्यांइतके राखल्याने नफा क्षमता वाढली आहे.
बँकेच्या कर्ज वाटपाचे प्रमाण (सीडीरेशो) प्रमाण 80 टक्के राखले आहे.
राज्य बँकेने दिलेली कर्जे 35 हजार 588 कोटी असून, एकूण ठेवी 26 हजार 359 कोटी रुपये झाल्या आहेत. यामुळे बँकेच्या एकूण व्यवहारात गतवर्षीपेक्षा 4 हजार 682 कोटीने वाढ होऊन एकूण व्यवहार 61 हजार 947 कोटी रुपयांइतका झाला आहे.
बँकेच्या प्रतिसेवक व्यवसाय 75 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.
बँकेच्या अनुत्पादित कर्जाचे निव्वळ प्रमाण (नेट एन.पी.ए.) 1.79 टक्के इतके आहे.
बँकेला सलग 13 वेळा ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त झाल्यामुळे उपस्थित सभासदांनी बँकेच्या प्रशासनाला अभिनंदन ठराव मंजूर केला.
राज्य बँकेचे दिनांक 31 मार्च 2025 अखेर नक्त मूल्य 5 हजार 396 कोटी
रुपये असून, गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये सुमारे 778 कोटी रुपयांची भरीव वाढ झाली आहे.