कडुस : कडुस-कोहिंडे बुद्रुक रस्त्यावर कङूस गावाजवळील पाझर तलावा जवळील घाट उतारावर भरधाव येणाऱ्या एसटी बस (एमएच १४ बीटी ४७१९) चालकाचे नियंत्रण सुटल्याने एस टी बस वेगात जाऊन बाजूच्या चारीत खड्ड्यात गेली. प्रवाशी, विद्यार्थीना आपत्कालिन मार्ग तसेच चालकाच्या बाजूचा दरवाजा उघडून बाहेर काढण्यात आले.(Latest Pune News)
मुक्कामी खरपूर गावावरून आलेली एसटी बस होती. या एसटी बसमध्ये सुमारे ४३ प्रवासी होते. यामध्ये विद्यार्थी व वृद्ध नागरिक होते. एसटी बसचा वेग इतका होता समोरून आलेल्या एसटी बस चालकाने शिताफिने आपली एसटी बस बाजूला घेतली;अन्यथा समोरासमोर दोन एसटी बसचा अपघात झाला असता; मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.