पुणे

SSC result 2023 Maharashtra : दहावीचा निकाल कोठे पाहाल? निकालाची तारीख आणि वेळ

मोहसीन मुल्ला

पुणे, पुढारी ऑनलाईन डेस्क : विद्यार्थी आणि पालकांत दहावीच्या निकालाची उत्सुकता लागलेली आहे. नेहमी प्रमाणे दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
हा निकाल खालीलपैकी कोणत्याही एका साईटवर पाहाता येणार आहे. (SSC result 2023 Maharashtra)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षांचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आला. तर दहावीच्या निकालाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. सर्वसाधारण जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा निकाल जाहीर होत असतो. (SSC result 2023 Maharashtra)

दहावी आणि बारावीची निकाल हा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. याच दृष्टीने दैनिक पुढारीने कोल्हापूर येथे नुकतेच एज्युदिशा हे शैक्षणिक प्रदर्शन आयोजित केले होते. तसेच सांगली आणि सातारा येथेही हे प्रदर्शन होणार आहे. सांगली येथे २, ३ आणि ४ जूनला हे प्रदर्शन होईल. तर सातारा येथे ९, १० आणि ११ जूनला हे प्रदर्शन होणार आहे.

दैनिक पुढारीच्या वेबसाईटवर एज्युदिशा या विशेष पानावर करिअर संदर्भातील विविध लेखही उपलब्ध आहेत. तज्ज्ञांनी लिहिलेल्या या लेखांचाही करिअरची निवड करण्यात चांगला उपयोग होऊ शकतो.

SCROLL FOR NEXT