पुणे

solider’s accidental death : लष्करातील जवानाचा रेल्वे अपघातात मृत्यू

अमृता चौगुले

आळेफाटा, पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिंदेवाडी (ता. जुन्नर) येथील भारतीय लष्करातील जवान शशिकांत पोपट शिंदे (वय-३८) यांचा सुट्टीसाठी गावी परतत असताना रेल्वे अपघातात मृत्यू ( solider's accidental death ) झाला. जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्य दलात ते कर्तव्यावर होते. शिंदेवाडीत मंगळवारी (दि. १८) दुपारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतामामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुट्टीसाठी शिंदे हे गावी परतत असताना रेल्वे अपघातात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू ( solider's accidental death ) झाला. शेतकरी व गरीब कुटुंबतील या जवानाच्या मृत्यूच्या बातमीने शिंदेवाडी गावात शोककळा पसरली होती. मंगळवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, सर्व प्रशासकीय अधिकारी, जुन्नर तालुका माजी सैनिक संघटना, आळेफाटा पोलीस आदी उपस्थित होते. पोलिसांनी वीर जवानाला मानवंदना दिली. शिंदे यांनी २० वर्ष देश सेवा केली असून त्यांच्या पश्चात पत्नी प्रगती, मुलगा वेदांत, प्रतीक तसेच आई-वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कारवेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. या कुटुंबाला धीर देण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी "अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे", भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणाने परिसर दुमदुमला होता.

SCROLL FOR NEXT