पुणे

बाप रे! चक्क घरीच उबवली सापाची अंडी

Laxman Dhenge

नवी सांगवी : केवळ हौस किंवा छंद म्हणून नाही तर संपूर्ण जीवनच प्राणी शास्त्राचा अभ्यास करण्यात घालविणार्‍या जुनी सांगवी येथील महेश बिळास्कर अवलियाने चक्क सापाची अंडी घरच्या घरी उबवून त्या नवजात अर्भकांना जीवनदान दिले आहे.

माती नारळाचा काथ्याचा केला वापर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पीएचडी करणार्‍या महेशला त्याच आवारातील आयुकामध्ये साप आल्याचा फोन आला. तो लागलीच तेथे पोहोचला आणि तस्कर जातीच्या त्या बिनविषारी सापाला त्याने पकडले असता त्याच्या लक्षात आले ती मादी असून तिच्या पोटामध्ये अंडी आहेत. त्याने त्या सापाला प्लास्टिकच्या बरणीत ठेवले असता त्या सापाने रात्रीतून आठ अंडी दिली.

बहुतेक साप अंडी देऊन निघून जातात. याला अपवाद फक्त किंग कोब्रा असतो. तो अंड्याची देखरेख करतो. तेव्हा महेशने या तस्कर जातीच्या सापाला निसर्गात मुक्त केले. परंतु, त्याच्यापुढे प्रश्न होता की ही अंडी करायची काय? कारण सापांच्या अंड्यांना मांजरापासून धोका असतो, हे लक्षात घेता त्याने माती नारळाचा काथ्या याचं कोकोपीट तयार केले आणि त्यावर ही आठ अंडी ठेवून ते 20 ते 30 टक्के मोश्चराईज करत होता.

पिल्लांना निसर्गाच्या अधिवासात सोडले

सापाची अंडी उबवायला सुमारे 65 दिवस लागतात. ऑगस्ट महिन्यात दिलेली अंडी पुढे ती नोव्हेंबरमध्ये उबवून त्यातून एकेक पिल्लू बाहेर पडायला लागले आणि त्यानंतर त्याने आठही पिल्ले निसर्गाच्या अधिवासात मुक्त केले. महेशने पिंजोर हरियाणा येथील बीएनएचएस या संस्थेमध्ये गिधाडांच्या संवर्धनासाठी एक वर्ष संशोधन केले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT