पुणे

पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेसमधून धूर…! प्रवाशांमध्ये पसरली घबराट

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुण्यातून बुधवारी सायंकाळी मुंबईकडे जाणार्‍या पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेसच्या डब्याखालून धूर निघाला. ही घटना खंडाळा घाटात घडली. अशा प्रकारे अचानकच गाडी खालून येत असलेल्या धुरामुळे प्रवाशांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. आणि गाडीलाही मुंबईला पोहचायला वेळ झाला. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. सायंकाळी सहाच्या सुमारास इंटरसिटी एक्स्प्रेस पुणे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने प्रवाशांना घेऊन रवाना करण्यात आली.

ही गाडी लोणावळ्याच्या पुढे खंडाळा घाटात गेल्यावर डी 7 आणि डी एच आरक्षित डब्याखालून धूर निघत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले, अन एकच भीतीचे वातावरण प्रवाशांमध्ये निर्माण झाले. यावेळी प्रवाशांनी तत्काळ रेल्वे प्रशासनाला ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. त्यानंतर रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी त्याची पाहणी करून तत्काळ उपाययोजना केल्या. त्यानंतर ही गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

जास्त दबाव आल्यामुळे आणि जास्त घर्षण झाल्यामुळे इंटरसिटी एक्स्प्रेसच्या ब—ेक बायडिंगमधून धूर निघू लागला. यामुळे यावेळी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, धूर निघत असलेल्या डब्यांची तातडीने तपासणी करण्यात आली असून, ही गाडी तत्काळ मुंबईच्या दिशेने सोडण्यात आली आहे.
                                                                      – शिवाजी सुतार,
                                                          जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT