पुणे

पुणे : स्मार्ट सिटीचा स्मार्ट उपक्रम; नव्या तंत्रज्ञानाचे काम अंतिम टप्प्यात

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नागरी प्रश्न आणि विविध तक्रारींची नोंद महापालिकेकडे करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करून पीएमसी अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच ते पुणेकरांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे. शहरातील नागरिकांना विविध सेवा सुविधा महापालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जातात.

मात्र, नागरिकांना भेडसावणारे प्रश्न नोंदविण्यासाठी पीएमसी केअरअंतर्गत टि्वटर, फेसबुक, संकेतस्थळ, कॉल सेंटर, पुणे कनेक्ट अ‍ॅप अशी माध्यमे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आता महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून नागरिकांच्या अ‍ॅपचे अद्ययावत करण्यात येत आहे. या अ‍ॅपमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येणार आहे. महापालिकेचे अ‍ॅप अद्ययावत करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, ते लवकरच नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT