पुणे

देशात नावलौकिक असणारा ‘सिंकदर’ गेला

स्वालिया न. शिकलगार

पुणे : पुढारी वृत्तसेवा – घोड्यांवरून प्रवास करण्याची फार पूर्वीपासून असलेली परंपरा काळानुरूप नामशेष होत गेली. पण अद्यापही घोड्यांच्या शर्यती आणि मजा म्हणून घोड्यावरून सवारी केली जाते. पण याच घोड्यांना इतिहास काळात महत्त्वपूर्ण स्थान होते. आजही अनेक भागांमध्ये टांगा वापरला जातो. लग्नातही काही ठिकाणी घोडा किंवा घोडी वापरण्याची परंपरा कायम आहे. इंदापूर तालुक्यातील अकोले गावातील शेतकरी निलेश अष्टेकर यांनी जिवापाड सिंकदर या घोड्याचा सांभाळ केला होता. मात्र आज सकाळी सिंकदरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

अधिक वाचा – 

देशातीत उंच घोड्यांमध्ये सिंकदरचा नावलौकिक

देशातीत उंच घोड्यांमध्ये सिंकदरचा नावलौकिक होता. तो ९ वर्षांचा होता. हा घोडा अष्टेकर फार्म येथे राहत होता. अनेक रेकॉर्डमध्ये त्याचे नाव नोंदवले होते. सोशल मीडियावर या घोड्याच्या निधनाची माहिती आल्यानंतर परिसरातील नागरिकांची हळहळ व्यक्त केली.
अष्टेकर यांच्या मते हा एक सुपरस्टार आणि शानदार घोडा होता. त्याचा पंजाबमध्ये जन्म झाला होता. ही आमच्या कुटुंबासाठी अत्यंत दु:खद घटना असल्याचे घोड्याचा सांभाळ करणाऱ्या कुटुंबाकडून कळवण्यात आले. सकाळी दहा वाजता अंत्यविधी करण्यात आला.

SCROLL FOR NEXT