पुणे

पिंपरी : कोल्हापुरी शॉपिंग फुड फेस्टिव्हलमध्ये खरेदीची धूम

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दैनिक पुढारी वृत्तसमुहातर्फे आयोजित व चकोते ग्रुप प्रस्तुत कोल्हापुरी शॉपिंग अ‍ॅण्ड फुड फेस्टिव्हलच्या दुसर्‍या दिवशी शहरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. फेस्टिव्हलला भेट देत नागरिकांनी मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला.
शाहूनगर येथील बहिरवडे ग्राऊड याठिकाणी हा खाद्य व खरेदी महोत्सव 17 ऑक्टोबरपर्यंत नागरिकांसासाठी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुला आहे. महोत्सवास नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे.

खास कोल्हापुरी खाद्य पदार्थाची रेलचेल या निमित्ताने भरविण्यात आलेल्या महोत्सवात कोल्हापुरी चिकन, मटण, भेळ, मिसळ असे शाकाहारी तसेच मांसाहारी जेवणही उपलब्ध आहेत. याठिकाणी अस्सल कोल्हापुरी चवीचे पदार्थ, चायनीज, ज्वेलरी, गृहपयोगी वस्तू, कपडे, सौंदर्य प्रसाधने, विविध प्रकारच्या बॅटरीवर चालणार्‍या टु व्हिलर तसेच कुंदन हुंदाई यांच्या विविध चारचाकी गाड्या पाहण्यास उपलब्ध आहेत. या प्रदर्शनामध्ये ऑटोमाबाईल, ईलेक्ट्रिक बाईक, घरगुती उपकरणांमध्ये आटा चक्की, घरगुती तेलाचा घाणा, वॉटर प्युरीफायर, दिवाळी सजावट साहित्य, बेकरी उत्पादने या सर्व स्टॉलवर नागरिकांनी गर्दी करत शॉपिंगचा आनंद लुटला.

शहरातील नागरिक सहपरिवार याठिकाणी खाद्य आणि खरेदीचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. लहान मुलांसाठी देखील याठिकाणी खेळणी, कपडे आणि विविध वस्तूंचे स्टॉल्स असल्याने बच्चे कंपनी देखील आनंदात आहेत. या महोत्सवाचे सहप्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज को – ऑपरेटिव्ह सोसायटी, स्मिता हॉलिडेज व ट्रॅव्हल पार्टर्नर, कुंदन हुंदाई हे आहेत.

खाद्य खरेदीबरोबरच मनोरंजनही
खाद्य व खरेदी महोत्सवामध्ये नागरिकांना खाद्य पदार्थाचा आस्वाद आणि खरेदी याबरोबरच याठिकाणी मनोरंजनाची देखील सुविधा करण्यात आली आहे. गीत गाता हू मै या हिंदी व मराठी गाण्याची मैफल गायक सचिन सोनटक्के आणि जिना शहा हे प्रेक्षकांसाठी सादर करत आहेत.

अप्पी आमची कलेक्टरच्या कलाकारांनी दिली महोत्सवास भेट
उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी झी टीव्हीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील शेहेनशहा रोहित परशुराम, सरकार प्रदीप कोथमिरे, स्मिता कदम, इजी मयुरी देशमुख यांनी फेस्टिव्हलला भेट दिली आणि नागरिकांची संवाद साधला तसेच खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.

आजचे आकर्षण
आज सायंकाळी सहा वाजता कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेतील कावेरी व राजवर्धन म्हणजेच तन्वी मुंडाले व विवेक सांगले हे खाद्य व खरेदी महोत्सवास भेट देणार आहेत. यावेळी कलाकारांशी गप्पा मारण्याचा आणि फोटोसेशन करण्याचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे.

SCROLL FOR NEXT