पुणे

पिंपरी : वंचित बहुजन आघाडीस धक्का; शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

अमृता चौगुले

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला धक्का बसला आहे. आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणी सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वंचित आघाडी ही भाजपाची मबीफ टीम बनली असून, देशातील लोकशाही वाचवायची असेल, तर भाजपला हद्दपार करावे लागेल. त्यामुळे आपण वंचितमधून बाहेर पडत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत तायडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या वेळी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, आझम पानसरे, आमदार सुनील शेळके, अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे व पदाधिकारी उपस्थित होते.

तायडे म्हणाले की, देशात भाजपकडून हुकूमशाही आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वंचित घटकांच्या शोषणाने कळस गाठला आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करणे ही काळाजी गरज बनली आहे. मात्र, वंचित बहुजन विकास आघाडीने भाजपला पूरक ठरणारी भूमिका या मतदारसंघात घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.

लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या रक्षणासाठी समविचारी असणार्‍या महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत ही विभागणी आम्ही टाळणार आहोत. दरम्यान, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अभिषेक दांगट यांनी नाना काटे यांना पाठिंबा जाहीर केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT