Shiv Sena MNS alliance Pudhari
पुणे

Shiv Sena MNS alliance: पुण्यात शिवसेना–मनसे युतीचा जल्लोष; टिळक चौकात कार्यकर्त्यांचा जलदंगळ

अलका टॉकीज चौकात फटाके, बँड व घोषणांनी परिसर दणाणला; राजकारणाला नवी दिशा मिळणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात युती झाल्याची घोषणा होताच बुधवारी (दि. 24) पुण्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठा जल्लोष केला. या युतीमुळे पुण्याच्या राजकारणाला आता नवी दिशा मिळण्याची चिन्हे समोर आली असून, आगामी काळात लवकरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

पुण्यातील ऐतिहासिक टिळक चौकात (अलका चित्रपटगृहासमोर) दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. घोषणांनी परिसर अक्षरश: दणाणून गेला होता. या वेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची मोठी आतषबाजी केली आणि बँडच्या तालावर ठेका धरत आपला आनंद व्यक्त केला.

या वेळी शिवसेना (उबाठा) पुणे शहराध्यक्ष आणि मनसे पुणे शहराध्यक्ष यांनी पेढे भरवून युतीचे स्वागत केले आणि आनंद व्यक्त केला. ही युती केवळ राजकीय नसून पुण्याच्या विकासासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी निर्माण झालेली एक वज्रमूठ आहे, अशी भावना या वेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली.

----------------------

फोटो : आजच्या तारखेला शिवसेना-मनसे जल्लोष नावाने सेव्ह केला आहे. (दि.24)

ओळ :- पुण्यातील ऐतिहासिक अलका टॉकीज चौकात एकत्रित जल्लोष करताना शिवसेना-मनसेचे कार्यकर्ते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT