जुन्नरचे आ. शरद सोनवणे आज शिवसेनेत प्रवेश करणार pudhari
पुणे

Pune: जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे आज शिवसेनेत प्रवेश करणार

शेकडो कार्यकर्त्यांचा देखील होणार प्रवेश; जुन्नर तालुक्यात शिवसेनेचे महत्त्व वाढणार

पुढारी वृत्तसेवा

सुरेश वाणी

नारायणगाव: शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (दि. २८) जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. तालुक्याच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये भगवे झेंडे लावल्याने सर्वत्र भगवेमय वातावरण झाले आहे. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे पुन्हा स्वगृही परतणार असल्याने व अनेकांचा प्रवेश शिवसेनेत होणार असल्याने जुन्नर तालुक्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद मजबूत झालेली पाहायला मिळणार आहे.

नारायणगावची संपूर्ण ग्रामपंचायतच शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्यामुळे एका मोठ्या शहराची सत्ता शिवसेना पक्षात येणार आहे. तालुक्यातील इतरही काही वजनदार नेते शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

माजी आमदार बाळासाहेब दांगट त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते सुरज वाजगे, शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रसन्ना डोके, जीवन शिंदे, विविध गावचे सरपंच, विविध गावच्या सहकारी संस्थांचे पदाधिकारी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहे. परिणामी, जुन्नर तालुक्यात पुन्हा एकदा शिवसेनेची ताकद पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, शिवसेना फुटण्यापूर्वी जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाची ताकद मोठी होती. परंतु शिवसेनेमध्ये विभाजन झाल्याने ही ताकददेखील दोन ठिकाणी विखुरली गेली. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद जुन्नर तालुक्यामध्ये तशी कमीच होती, परंतु आता शरद सोनवणे आमदार झाल्याने व तालुक्यातील इतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत येणार असल्याने जुन्नर तालुक्यामध्ये शिंदे शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.

शरद सोनवणे जुन्नरचे पुन्हा आमदार झाल्याने तालुक्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा नारायणगाव येथे होत असल्याने व शिवसेना पक्षांमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश होत असल्याने तालुक्यामध्ये शिंदे यांची शिवसेनेला उभारी घेण्यास मदत होणार आहे.

आमदार शरद सोनवणे व इतर कार्यकर्ते शिवसेनेत येणार असल्याने याचा फायदा आगामी होणाऱ्या जुन्नर नगरपरिषद तसेच जुन्नर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाला होणार आहे.

नियोजित पुतळा स्थळाची पाहणी करणार

प्रामुख्याने नारायणगाव येथील पूर्व वेशीजवळ ज्या ठिकाणी सभा होणार आहे, त्या सभेच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जुन्नर तालुक्यात आल्यानंतर प्रथम गोद्रे येथील आमदार शरद सोनवणे उभा करीत असलेल्या ३०० फुट उंचीच्या छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या पुतळा स्थळाची पाहणी करणार आहेत. नंतर आमदार सोनवणे यांच्या रायगड येथील कार्यालयाला भेट देणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT