शरद पवार Pudhari file photo
पुणे

Sharad Pawar |शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल

पुण्यातील रुबी हॉलमध्ये उपचार सुरू, सुप्रिया सुळेंनी दिली एक्स पोस्टच्या माध्यमातून माहिती

पुढारी वृत्तसेवा

Sharad Pawar hospitalised

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आहे. अस्वस्थ वाटत असल्याने शरद पवार रुग्णालयात दाखल झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळेंनी एक्स पोस्ट आणि WhatsApp वर स्टेटस ठेवून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

अजित पवारांच्‍या निधनानंतरही बिघडली होती तब्‍येत

अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. शरद पवार तीन दिवसांपासून पुण्यातील निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. मात्र अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना पुन्हा एकदा रुबी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आम्ही बाबांना पुढील तपासण्या आणि हायड्रेशनसाठी (शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी) रुबी हॉल, पुणे येथे दाखल करत आहोत. सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार."

संसदीय कार्यकिर्दीच्‍या साठव्या वर्षात पदार्पणानिमित्तही सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना

शरद पवारांच्या संसदीय कार्यकिर्दीचं साठव्या वर्षात पदार्पण. खासदार सुप्रिया सुळेनी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुप्रिया सुळेनी जनतेसह कार्यकर्त्यांचे आभार मानले. शरद पवार सहा दशकांच्या काळात महत्त्वाच्या घडामोडींचे साक्षीदार राहिले. सुळेंनी पोस्ट केली आहे, 1967 साली सुरू झालेला अभिजात प्रवास आजही अव्याहतपणे सुरू आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आदरणीय पवार साहेब यांची संसदीय कार्यकिर्द आज साठव्या वर्षात पदार्पण करत आहे. या सहा दशकांच्या काळात कित्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी सहा वेळा तर एकदा विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. तब्बल सात वेळा ते लोकसभेत निवडून गेले तर दोन वेळा त्यांनी राज्यसभेत प्रतिनिधित्व केलं. सन 1967 साली आजच्या दिवशी सुरू झालेला हा अभिजात प्रवास आजही अव्याहतपणे सुरू आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या सोबत त्यांचे जीवाभावाचे सोबती कार्यकर्ते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मायबाप जनता ठामपणे उभी राहिली. जनतेच्या विश्वासाच्या बळावरच हा प्रवास शक्य झाला. याबद्दल या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. धन्यवाद, अशी सोशल मीडिया पोस्ट खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT