NCP Party name-symbol row 
पुणे

Pawar Family News | 'तुमचे १२ वाजायला १० मिनिटं शिल्लक'; शरद पवार गटाची सूचक पोस्ट चर्चेत

अजित पवार गटाला टाेला

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : शरद पवार गटाने अजित पवार यांचा हातात घड्याळ घेतलेला फोटो पक्षाच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. यामध्ये अजित पवार यांच्यावर पक्षाच्या घड्याळ चिन्हावरून टोला लगावला आहे. ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

तुमचे १२ वाजायला १० मिनिटं शिल्लक; अजित पवारांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार गटाने आपल्‍या X पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'स्वतः कमावलेल्या आणि हिसकावून घेतलेल्या गोष्टीत फार फरक असतो. त्यामुळेच तुम्ही हिसकावून घेतलेलं चिन्हं सुद्धा तुमचे १२ वाजायला १० मिनिटं शिल्लक आहे दाखवतय'.

दोन्ही पवार पुण्यातील बैठकीला हजर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शासकीय कार्यक्रमात देखील दोन्ही पवारांनी एकमेकांकडे बघणे देखील टाळले. मात्र, दोन्ही पवार पुण्यात शनिवारी (दि.२० जुलै) जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले होते. या प्रसंगी ते प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात बोललेही; याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. बैठकीत खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी उत्तरेही दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT