पुणे: देशातील परिस्थिती गंभीर असल्याचे केंद्र सरकारकडून सांगितले जात असताना महत्त्वाचे निर्णय आणि काटकसरीचे आवाहन पाच राज्यांच्या निवडणुकांनंतरच का करण्यात आले, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी उपस्थित केला. राष्ट्रीय प्रश्नांवर सरकारने सर्वपक्षीय चर्चा करून भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी केंद्र सरकारच्या अलीकडील भूमिकेवर भाष्य केले. इराणसह मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम भारतावर होत असल्याचे स्पष्ट असतानाही सरकारने वेळेवर निर्णय घेतले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. ‘जर परिस्थिती इतकी गंभीर होती, तर जनतेला आधीपासून सावध का करण्यात आले नाही? निवडणुका संपल्यानंतरच काटकसरीचे संदेश देण्यामागचे कारण काय?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Jejuri Flyover Project: जेजुरीला 250 कोटींचा उड्डाणपूल, तर फलटणच्या विकासासाठी 97 कोटी; गडकरींकडून पालखी मार्गावर घोषणांचा पाऊपवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनबचत, परकीय चलनाचा संयमी वापर आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे केलेले आवाहन योग्य असले तरी सरकारच्या कृतीत त्याचे प्रतिबिंब दिसत नसल्याचे पवार म्हणाले.
त्यांनी सोमनाथ मंदिरातील कार्यक्रमाचा उल्लेख करताना, ‘एका बाजूला पेट्रोल-डिझेल बचतीचे आवाहन करायचे आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर विमानांचा वापर करायचा, ही भूमिका विसंगत वाटते,’ अशी टीका केली. दरम्यान, पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, केंद्र सरकारच्या निर्णयप्रक्रियेवर विरोधकांकडून पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.