पुढारी ऑनलाईन डेस्क : काटेवाडी' ते 'संसद' असा राजकीय प्रवास असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) अध्यक्ष शऱद पवार यांचा आज वाढदिवस. २०१९ विधानसभा निवडणूक प्रचार काळात त्याचं एक भाषण चांगलचं गाजलं होते. ७९ वर्षांचा एक 'तरुण'च्या भरपावसात सभा घेतो आणि तरुणाईलाही लाजवेल या तडफेने आपल्या पक्षाचा प्रचार करतो हे सारच थक्क करणारं होते.आज शरद पवारांचा ८२ वाढदिवस ( Sharad Pawar Birthday ) ते ८३ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. जाणून घेवूया त्यांचा पावसातील भाषणाचा किस्सा.
२०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उदयनराजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच शरद पवार यांच्यासाठीही प्रतिष्ठेची ठरली होती. भाजपाकडून उदयनराजे यांना तिकीट जाहीर झालं. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवले. श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीची सभा साताऱ्यात होणारी होती. सभेचा दिवस ठरला १८ ऑ्क्टोबर २०१९.
साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली ही निवडणूक ऐतिहासिक अशी ठरली, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. साताऱ्यातील सभा सुरू व्हायला आणि पाऊस यायला एकच वेळ झाली. ७९ वर्षाचे शरद पवार उत्साहात सभा घेत होते. सभेत काय म्हणाले वाचा त्यांच्या शब्दात,
शरद पवार म्हणाले, "चूक झाली तर ती चूक कबुल करायची असते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली. हे मी जाहीरपणे साताऱ्यात कबूल करतो. लोकसभेच्या निवडणुकी उमेदवारीमध्ये माझी चुक झाली हे मी मान्य करतो. उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या कॉंग्रसेच्या स्वागतासाठी साक्षात वरुणराजने सुद्धा आपल्याला आशीर्वाद दिलायं. आणि त्यांच्या आशीर्वादाने हा सातारा जिल्ह्यात महाराष्ट्रात चमत्कार करणार आहे. त्या चमत्काराची सुरुवात उद्याच्या २१ तारखेला होणार आहे."
"विधानसभेची निवडणूक आहे. लोकसभेची निवडणूक ताजी आहे. एका दृष्टीने मी विचार करत होतो की. मी आज तुमच्यापुढे काय बोलावं. माझ्या मनामध्ये एक गोष्ट आली की एखाद्या माणसाकडून चुक झाली तर ती चूक कबुल करायची असते. लोकसभेच्या उमेदवारी निवडीमध्ये माझ्याकडून चुक झाली हे मी जाहीरपणे मान्य या ठिकाणी करतो. पण मला आनंद आहे की, ती चूक दुरुस्त करण्यासाठी साताऱ्यातील जिल्ह्यातील घराघरातील तरुण, वडिलधारी, सगळेजण 21 ऑक्टोबरची वाट बघत आहेत. २१ तारखेला मतदानादिवशी आपल्या मताचा निर्णय घेऊन श्रीनिवास पाटलांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील. यातून सातारकर आम्ही लोकांनी जी काही चूक केली त्याबाबत जो निर्णय घ्यायचा तो आमच्या दृष्टीने निर्णय घेतील."
"निवडणूक ही महत्त्वाची आहे, देशाचे पंतप्रधान ही येथे येवून गेले आणखीन काही ठिकाणी येवून गेले. एका बाजुने राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की, आम्हाला काय या निवडणूकीमध्ये दिसत नाही, ते म्हणतात या निवडणूकीत दुसऱ्या बाजुने पैलवानचं दिसत नाही. याबद्दल मी त्यांना जाहीरपणे सांगितलं की तुमच्याकडे पैलवान असतील याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण या तालुक्यामध्ये अनेक उत्तम पैलवान तयार करण्याची संबधीचे काम करणारे अनेक आमचे सहकारी आहेत. आणि भाजपाच्या तोंडात न शोभणारा कुस्ती, पैहलवान विषय आहेत."
शरद पवार म्हणाले, "या निवडणुकीत कुस्ती वगैरे काही नाही. येणाऱ्या 21 तारखेला तुमच्या मतदानाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला सांगणार आहे की सातारा जिल्हा शब्दाचा पक्का, चुकीच्या गोष्टीचा निर्धार करणारा, खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जतन करणारा आणि तो इतिहास तुम्हाला उद्या करायचा आहे. तोच निश्चीत कराल अशा प्रकारची अपेक्षा याठिकाणी व्यक्त करतो. राष्टवादीच्या उमेदवारांना ऐतिहासिक मताधिक्काने विजयी कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्या कामाला तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि माझे दोन शब्द संपवतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र
शरद पवारांच्या भरपावसातील या सभेनंतर हे भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरलं झालं. ७९ वर्षांच्या शरद पवारांच्या उत्साहाची आणि त्यांनी उदयनराजेंवर केलेल्या टीकेबद्दल चर्चा होवू लागली. शरद पवारांच्या भरपावसातील भाषणासारखी मतही अशी भरघोस मिळणार का? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगु लागल्या. सोशल मीडियावर 'मिम्स'चा पाऊस पडू लागला. परिणामी या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजेंचा पराभव झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटीलमताधिक्याने लोकसभेवर निवडून आले. शरद पवारांचं हे भाषण त्यांच्या पायाला जखम असताना भर पावसात केलं होतं. राजकीय वर्तुळात बोललं जावू लागलं शरद पवारांची ही ऐतिहासिक सभा उदयनराजेंना जखम देवून गेली. या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना 6,36,620 मते (51.04%) तर उदयनराजे यांना 5,48,903 मते (44.01%) मिळाली.
भरपावसातील शरद पवारांच भाषण एवढं गाजलं की, एखादा नेता प्रचारावेळी पावसात भिजला तरी शरद पवारांच्या साताऱ्यातील भाषणाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मध्यंतरी भारत जोडो यात्रेदरम्यानच दक्षिण भारतातील राहुल गांधी यांचही पावसातील भाषण खूप गाजलं. फक्त शरद पवारांनीच पावसात सभा घेतली का? तर असे नाही. यापूर्वीही अनेक नेत्यांच्या पावसातील सभा गाजल्या आहेत. त्यामध्ये एक उदाहरण देता येईल ते म्हणजे, अटलबिहारी वाजपेयी यांच लाल किल्यावरील २००३ मधील स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेलं भाषण, लाल कृष्ण अडवाणी यांनीही जन चेतना यात्रे दरम्यान पावसात केलेले भाषण गाजले होते.