पुणे

पिंपरी : बदनामीची धमकी देत लैंगिक अत्याचार

अमृता चौगुले

पिंपरी : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. हा प्रकार 29 मार्च 2020 ते 2 मार्च 2023 या कालावधीत मोई आणि भोसरी परिसरात घडला. याप्रकरणी पीडितेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नीलेश अमृत मोरे (30, रा. मोई, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचे अंघोळ करताना फोटो काढले. ते फोटो फिर्यादी यांच्या पतीला दाखवण्याची तसेच व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक संबंध ठेवले. त्यानंतर महिलेला वारंवार लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

SCROLL FOR NEXT