पुणे

धायरी : लायगुडे दवाखान्यासमोर सांडपाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अमृता चौगुले

धायरी; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रोड परिसरातील वडगाव खुर्द येथील राजयोग सोसायटी परिसरात मुख्य रस्त्यावरच ड्रेनेज तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. लायगुडे दवाखान्यासमोर हे सांडपाणी वाहत असल्याने रुग्ण व नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याबाबत अनेक वेळा महापालिकेकडे तक्रार करूनही प्रशासनाने अद्याप दखल घेतली नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

भाजप युवा मोर्चा खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे संघटन सचिव सारंग नवले म्हणाले, 'या ठिकाणी गेल्या सहा महिन्यांपासून सांडपाणी वाहत आहे. यामुळे परिसरात साथीचे आजार पसरत आहे. महापालिकेच्या लायगुडे दवाखान्यासमोरील रस्त्यावरून हे सांडपाणी वाहत आहे. यामुळे रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना व परिसरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सांडपाणी वाहिनीची तातडीने दुरुस्ती करावी; अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.' याबाबत महापालिकेचे कनिष्ठ अभियंता देव्रेंद्र राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT