Holiday  
पुणे

पुणे : नववर्षात आली सात दिवसांची जंबो दिवाळी

अमृता चौगुले

दीनानाथ द. गोरे :

पुणे : येत्या वर्षात सात दिवसांची जंबो दिवाळी येण्यासह रविवारला जोडून सात दिवस सुट्ट्या आल्या आहेत. शिवाय एप्रिल महिन्यात नऊ सुट्ट्या मिळणार असून, अधिकचा श्रावण महिना आणि वर्ल्ड क्रिकेट कप याच वर्षी असल्याने आबालवृद्धांसाठी आनंदाचे वर्ष असणार आहे. बर्‍याच वर्षांनी 'अनंत चतुर्दशी'ला 'सार्वजनिक सुट्टी'(गुरुवार, 28 सप्टेंबर) आणि 'अधिक श्रावण' महिना असणार्‍या 2023 सालात रविवारला जोडून 7 वेळा सोमवार किंवा शनिवारची 'सार्वजनिक सुट्टी' असून, 'स्वातंत्र्यदिनाला'(15 ऑगस्ट), पारसी नववर्षदिनाची जोडून सुट्टी(16 ऑगस्ट) आहेच.

'एप्रिल, सप्टेंबर आणि नोव्हेंबर' हे 30 तारखांचे महिने सर्वांचे आवडते ठरणार आहेत. कारण, रविवारसह 9 सुट्ट्या एप्रिलमध्ये आहेत. सप्टेंबरमध्ये 'संकष्टी चतुर्थी', श्रीगणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी अशा तिनही दिवसांना, रविवारची व सार्वजनिक सुट्टी आहे. नोव्हेंबरमध्ये 1 व 30 तारखांना संकष्टी चतुर्थी असून, 7 वर्षांनी 7 दिवसांची 'जम्बो दिवाळी' (9 ते 15 नोव्हेंबर) आहे.

सोमवार ः 4) 1 मे (महाराष्ट्र व आंतरराष्ट्रीय कामगार दिन), 5) 2 ऑक्टोबर (म.गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती), 6) 25 डिसेंबर (नाताळ), 7) 27 नोव्हेंबर (गुरुनानक जयंती, कार्तिक पौर्णिमा), 8) 15 ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) मंगळवार, 16 ऑगस्ट(पारसी नववर्षदिन) बुधवार,(अधिक श्रावण अमावस्या), छ.शिवाजी महाराज जयंती व लक्ष्मीपूजन रविवारी आहे. 15 ऑगस्टशिवाय, तिथीने मिळणार्‍या 5 सार्वजनिक सुट्ट्या, आठवड्यातील एकमेव पंचाक्षरी (5 अक्षरे असलेला) वार 'मंगळवार' असणार आहे.

मंगळवारी आलेल्या सुट्ट्या

1)7 मार्च (धूलिवंदन, फाल्गुन वद्य 1), 2)4 एप्रिल (महावीर जयंती,चैत्र शु.13), 3) 15 ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन, तारखेने येणारी सुट्टी), 4) 19 सप्टेंबर (श्रीगणेश चतुर्थी,भाद्रपद शुक्ल 4), 5)24 ऑक्टोबर (दसरा, अश्विन शुक्ल 10), 6) 14 नोव्हेंबर (दिवाळी पाडवा, कार्तिक शु.1).
1950, 1961, 1967, 1978, 1989, 1995, 2006 आणि 2017 सालाप्रमाणे 2023 सालचे कॅलेंडर (तारीख, वार सारखे) आल्याने एकाच वाराला येणार्‍या 1 मे, 2 ऑक्टोबर व 25 डिसेंबर या 3 सुटट्या सोमवारी, 26 जानेवारीची (प्रजासत्ताक दिन) सुट्टी गुरुवारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची 14 एप्रिलची शुक्रवारी असणार आहे. 15 ऑगस्टची मंगळवारी. (या शतकातील 2006 व 2017 सालाप्रमाणेच वरील 6 सुट्टया (तारखेने मिळणार्‍या) 2023 मध्येही त्या त्या वारांना आल्या आहेत) बुद्धपौर्णिमा 5 मे रोजी व बकरी ईद 28 जूनला आहे.

जोडून सुट्ट्या आल्या

शनिवार : 1) 18 फेब्रुवारी (महाशिवरात्र), 2)22 एप्रिल (रमजान ईद व अक्षय्यतृतीया),  3) 29 जुलै (मोहरम)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT