ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक  Pudhari News network
पुणे

Crime News: ज्येष्ठ नागरिकाची 2 कोटी 82 लाखांची फसवणूक

या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आले

पुढारी वृत्तसेवा

Senior citizen cheated

पुणे : बनावट कागदपत्रांचा वापर करून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या मालमत्तेवर बँकेकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढून, त्याचा गैरवापर करत दोन कोटी 82 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. (Pune News Update)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार हे उंड्री येथील रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या मालमत्तेवर कोणतेही कर्ज घेतलेले नसतानाही, काही व्यक्तींनी संगनमताने त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या मालमत्तेचे बनावट कागदपत्र तयार केले. ही कागदपत्रे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब अँड सिंध बँकेकडे तारण म्हणून सादर करून, त्यावर दोन कोटी 82 लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले. या संपूर्ण व्यवहारासाठी जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक, आकुर्डी शाखेत तक्रारदाराच्या नावाने बनावट खाते उघडण्यात आले, आणि त्याच खात्यावर कर्ज रक्कम वळवण्यात आली.

ही आर्थिक फसवणूक ऑगस्ट 2022 पासून आजतागायत सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे. फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी संबंधितांविरोधात फसवणूक, विश्वासघात, बनावट दस्तऐवज तयार करणे, खोटी माहिती देणे, जीवनास धोका निर्माण करणे आणि कट रचणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT