कॅब प्रवास pudhari
पुणे

गाडीचा आरसा तिच्या चेहऱ्यासमोर सेट केला अन्... महिलेसमोरच कॅब चालकाने

खडकी पोलिसांनी सुमीत कुमार नावाच्या परप्रांतीय कॅबचालकास अटक केली

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील आयटी कंपनीतील महिलेला कॅब प्रवासात धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले. या महिलेच्या तक्रारीनंतर ही बाब उघडकीस आली. दरम्यान, आयटी कंपनीतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी सुमीत कुमार नावाच्या परप्रांतीय कॅबचालकास अटक केली आहे.

खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या 41 वर्षीय महिला अभियंता (टेक्नोलॉजी प्रोफेशनल) यांनी तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेने एका प्रसिद्ध अ‍ॅपद्वारे कॅब बुक केली. कल्याणीनगर येथील आपल्या कार्यालयातून सायंकाळी साडेसातच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घरी जाण्यासाठी त्या निघाल्या होत्या. गाडी शहदवाल बाबा चौकात पोहचली आणि संगमवाडी रोडमार्गे पाटील इस्टेट चौकाच्या दिशेने जाऊ लागली. तेव्हा चालकाने आरसा महिलेचा चेहरा दिसेल असा सेट केला. यानंतर तो आरशात महिलेला पाहून चालत्या गाडीत अश्लील कृत्य करू लागला. पीडित महिला घाबरली. गाडी सिग्नलपाशी थांबताच तिने दरवाजा उघडून बाहेर पळ काढला. त्यानंतर महिलेने थेट खडकी पोलिस ठाणे गाठले. दरम्यान, कॅबचालकाने पुढे जाऊन महामार्गावर गाडी एका बाजूला थांबवली आणि तेथून पळ काढला. पोलिसांनी महिलेकडून कॅब बुकिंगचा तपशील आणि वाहन क्रमांक घेतला. त्याआधारे कॅब मालकाचा शोध लागल्यावर चालकाला अटक करण्यात आली. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील असून, काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवड येथे स्थलांतरित झाला आहे. पुढील तपास खडकी पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT