पुणे

अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अकरावी प्रवेशाच्या दुसर्‍या फेरीची गुणवत्ता यादी आज (दि.3) सकाळी 10 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. तर प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 5 जुलैपर्यंत महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घेता येणार आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसर्‍या फेरीचे कोटा तसेच कॅपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार 27 ते 29 जूनदरम्यान विद्यार्थ्यांना पहिल्या भागात दुरुस्ती करण्याबरोबरच पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात आली होती.

तर 3 जुलै रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येऊन 5 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. दरम्यान, 5 जुलैपर्यंत कोटाअंतर्गत प्रवेशदेखील होणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अकरावी प्रवेशाठी 324 महाविद्यालयांत 89 हजार 394 कॅपच्या तसेच 24 हजार 956 कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 1 लाख 14 हजार 350 जागा उपलब्ध आहेत.

त्यापैकी पहिल्या फेरीत कोटा आणि कॅप मिळून 27 हजार 255 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर प्रवेशासाठी 87 हजार 95 जागा उपलब्ध आहेत. पहिल्या फेरीत नामांकित महाविद्यालयांचे कटऑफ नव्वदीपार असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक दुसर्‍या फेरीची वाट पाहात होते. आता दुसर्‍या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर कटऑफमध्ये नेमका काय बदल होतो यावरच विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची वाटचाल ठरणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT