पुणे

पिंपरी : गणेशमूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारांची लगबग

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवाला अजून दोन महिने शिल्लक उरले असले तरीही गणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. यंदा दहा फुटांपर्यंतच्या मूर्तींना परवानगी असल्यामुळे कारखान्यामध्ये एक फुटापासून ते दहा फुटांपर्यंतच्या मूर्ती बनविण्यात येत आहेत. सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. मंडळांसाठी मोठ्या मूर्ती मातीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करण्यात येतात. पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस वापरास मज्जाव करण्यात येत असला तरी मोठ्या मूर्तींसाठी सर्रास वापर सुरू आहे. सार्वजनिक गणेश मूर्ती चार फुटांपासून दहा-बारा फुटी असते.

काहीजण मातीच्या मूर्तीचा आग्रह धरत असल्याने काही मूर्तिकारांनी लाल चिकनमातीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. काही जण मातीच्या मूर्तीचा आग्रह धरत असल्याने मातीपासून मूर्ती करण्यात आल्या आहेत. शाडूची माती महाग पडत असल्याने मूर्ती वाळण्यास जास्त दिवस जात आहेत. त्यामुळे मूर्तिकार सध्या कामात व्यस्त झाले आहेत.

गणेश चतुर्थीसाठी दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. गणेशमूर्तीचे काम कारखान्यामध्ये वर्षभर चालत असते. तसेच बर्‍याचदा पीयूपीच्या मूर्तींवर बंदी घातली जाते. त्यामुळे तयार केलेल्या मूर्तींचे करायचे काय, हा प्रश्न पडतो. तरीदेखील पीयूपी मूर्ती या हाताळण्यास सोयीस्कर असल्याने पीयूपी मूर्तींची नागरिकांकडून खरेदी केली जाते.

तसेच शाडूची मूर्ती जड असते. त्यामुळे मोठ्या मूर्ती शाडूच्या बनविता येत नाही. गणेशोत्सवामध्ये मंडळांना जास्त उंचीची मूर्ती हवी असते. मोठ्या आकाराच्या व उंचीच्या मूर्ती पीयूपीच्या बनविल्या जातात. दरवर्षी पुण्यासारख्या शहरात मोठमोठ्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मंडळामध्ये चुरस लागते. गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी मंडळांच्या मांडवातील मंगलमूर्ती साकारण्यासाठी कलावंत दिवस – रात्र यामध्ये मग्न असतात. आतापासूनच कारखान्यामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मूर्तीसाठी बुकिंग सुरू झाले आहे.

आमच्याकडे वर्षभर गणपती मूर्तींचे तयार करण्याचे काम सुरू असते. मूर्तींचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. घरगुती आणि मंडळांच्या मूर्तीचे बुकिंगही सुरू झाले आहे. मूर्ती तयार होऊन रंगरंगोटी सुरू आहे.

– रवींद्र चित्ते, मूर्तिकार

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT