'दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातील ससूनचा अहवाल जाळून टाकायला हवा'  pudhari Photo
पुणे

Supriya Sule: 'दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातील ससूनचा अहवाल जाळून टाकायला हवा'

खासदार सुप्रिया सुळे यांची संतप्त प्रतिक्रिया

पुढारी वृत्तसेवा

पुणे: तनिषा भिसे प्रकरणात ससूनने दिलेल्या अहवालावर विश्वास बसत नाही. या अहवालाचा निषेध करते. तो अहवाल जाळून टाकायला हवा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत केला. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते. सुळे म्हणाल्या, इतका चुकीचा अहवाल येऊ शकतो, हे धक्कादायक आणि असंवेदनशील आहे.

एखाद्या महिलेबद्दल असे असंवेदनशील भाष्य करणे धक्कादायक आहे. हा अहवाल विश्वासार्ह नाही. अहवालात ताळमेळ नाही, हे सरकारने स्पष्ट करायला हवे. महिलेला न्याय द्यायचा आहे. एका लेकीची हत्या झाली आहे, दुसर्‍या कुठल्या बहिणीची हत्या होऊ देणार नाही. ससूनचा तो अहवाल मी मानत नाही. तो कचर्‍याच्या डब्यात नाही, तर जाळून टाकायला हवा, अशी टीका त्यांनी या वेळी केली.

प्रशांत जगताप हे प्रकरण लढत आहेत, आम्ही त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे आहोत. तिला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. ती महाराष्ट्राची लेक, कोणाची बायको, आई आहे. हे सरकार विसरले, पण आम्ही माणुसकी विसरलो नाही. वेळ पडली तर रस्त्यावर उतरू. या लेकीची हत्या ज्यांनी केली, त्यांना शिक्षा मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे सुळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT