तळेगाव स्टेशन: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रांतिकारक प्रदर्शन तळेगाव स्टेशन भागातील सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्या मंदिरमध्ये १३ ते १५ ऑगस्ट असे भरविण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड,शिक्षण समिती सदस्या ज्योती चोळकर, सदस्य विश्वास देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नवनाथ गाढवे, बालवाडी विभाग प्रमुख सोनाली काशिद उपस्थित होते. यावेळी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त इ. ५वी ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषेत येऊन त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली .हे प्रदर्शन पालकांनाही पाहण्यास खुले ठेवण्यात आले आहे. या प्रदर्शनास पालकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.