पुणे

दौंड तालुक्यात वाहनातून हातभट्टीची विक्री

अमृता चौगुले

रावणगाव(दौंड ); पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्याच्या पूर्व भागात चारचाकी वाहनातून होणार्‍या अवैध हातभट्टी दारूचा पुरवठा हा चर्चेचा विषय होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व पोलिस प्रशासन याकडे जाणूनबुजून डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मागील काही दिवसांपासून हवेली तालुक्यातून येणारी अवैध हातभट्टी दारू बोरीबेल तसेच मलठण परिसरातील दोन ठिकाणच्या अड्ड्यांवर पहाटेच्या सुमारास उतरवली जात आहे. तीन आलिशान चारचाकींतून दारूचा अनेक गावांत पुरवठा होत आहे. रावणगाव (ता. दौंड) औट पोस्ट पोलिस चौकीचे कर्मचारी मूग गिळून बसल्याचा आरोप जागरूक नागरिकांनी केला आहे.

खडकी, बोरीबेल, रावणगाव,
मळद, मलठण, लोणारवाडी व स्वामी चिंचोली या भागात व पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हातभट्टीची विक्री होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. दौंड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना याबाबत अधिक विचारणा केली असता वरिष्ठ अधिकारी गैरहजर असल्याचे सांगण्यात आले.

SCROLL FOR NEXT