पुणे, पुढारी वृत्तसेवा: एमआयटी-एडीटी विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक राजस्तरीय आंतर-महाविद्यालयीन जलतरण क्रिडा स्पर्धेत साक्षी मनोज छाजेड हिने तीन सुवर्ण पदके, एक रौप्य पदकांसह सर्वोत्कृष्ट जलतरणपटूचा पुरस्कार पटकवला.
28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत लोणी काळभोर येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत महाराष्ट्रातील 130 विद्यापीठांतील चार हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, एमआयटीचे शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडू दत्तू भोकनाल यांनी साक्षीचा जलतरणमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार केला.
साक्षी छाजेड हिने तिचे कॉलेज मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्रितिनिधीत्व करत पुरस्कारावर आपले नाव कोरले. साक्षी आर्किटेक्चरच्या शेवटच्या वर्षात शिकत असून ती प्रसिद्ध व्यवसायिक समाजिक कार्यकर्ते मनोज छाजेड यांनी कन्या आहे.