पुण्याची मान उंचावली! एनडीए परीक्षेत मुलींमध्ये ऋतुजा वराडे देशात प्रथम Pudhari
पुणे

NDA Exam Topper 2025: पुण्याची मान उंचावली! एनडीए परीक्षेत मुलींमध्ये ऋतुजा वराडे देशात प्रथम

ऑल इंडिया रँकमध्ये मिळवले तिसरे स्थान

पुढारी वृत्तसेवा

Rutuja Varhade NDA exam topper 2025

पुणे: राष्ट्रीय संरक्षण अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत पुण्यातील ऋतुजा वराडे हिने मुलींमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच तिने ऑल इंडिया रँकिंगमध्ये तिसरे स्थान मिळवत नवा इतिहास रचला आहे. तिचे वडील संदीप वराडे हे वेब डिझाइन प्राध्यापक असून, आई जयश्री ह्या गणिताच्या शिक्षिका आहेत.

एनडीएमध्ये मुलींना तब्बल पंचाहत्तर वर्षांनी प्रवेश मिळाला. पहिली प्रवेश परीक्षा 2022 मध्ये झाली होती. यंदा मुलींसाठीची ही दुसरी आहे. केवळ 90 जागांसाठी सुमारे दीड लाख मुलींनी परीक्षा दिली होती. यात पुणे शहरातील ऋतुजाने मुलींमध्ये प्रथम तर सर्वसाधारण यादीत तिसरे स्थान मिळवले आहे.

एनडीएमध्ये मुलींना प्रवेश मिळताच निश्चय

भारत सरकारने राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे दरवाजे मुलींसाठी उघडले तेव्हाच ऋतुजाने या क्षेत्रात करिअर करण्याचा निश्चय केला होता. जिद्द आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर तिने हे यश मिळविले आहे. यापूर्वी तिने विज्ञान ऑलिम्पियाड आणि राज्यस्तरीय गणित स्पर्धांमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच ती एक प्रशिक्षित हार्मोनियमवादक आणि गायिका देखील आहे. ऋतुजाने या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करण्यासाठी दोन वर्ष कठोर परिश्रम घेतले.

दीड लाख मुलींनी दिली परीक्षा

एनडीए परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. यात सुरुवातीला लेखी परीक्षा उत्तीर्ण होते, पाच दिवस तोंडी परीक्षा होते. लेखी परीक्षेला सुमारे दीड लाख मुली होत्या, त्यापैकी एक हजार मुलींची तोंडी परीक्षेसाठी निवड झाली आणि त्यातून 90 मुलींची निवड झाली. त्यात ऋतुजाने देशात अव्वलस्थान मिळवत पुण्याची मान उंचावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT