पुणे: आवडीचे वाहन खरेदी केल्यानंतर वाहन नंबर व्हीआयपी असावा, यासाठी अनेक वाहनमालक आग्रही असतात. त्यासाठी वाट्टेल तेवढे पैसे मोजण्याची त्यांची तयारी असते. अशाच चॉइस नंबरमधून (पसंती क्रमांक) पुणे आरटीओला गेल्या वर्षभरात म्हणजेच सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 59 कोटी 36 लाख 92 हजारांचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महसुलात 15 कोटींची वाढ झाल्याचे समोर आले आहे.
अनेकजण त्यांना लकी असलेले नंबर किंवा जन्मदिवसाची तारीख ही नंबरप्लेटच्या माध्यमातून गाडीला लावण्यासाठी आग्रही असतात. यासाठी परिवहन विभागाकडून पैशांची आकारणी केली जाते.
आवडीचा क्रमांक हवा असेल, तर त्यासाठी विशिष्ट रकमेचा धनादेश भरून तो आरटीओ कार्यालयात जमा करावा लागतो. त्यानंतर हा नंबर संबंधित वाहनधारकासाठी राखीव करून ठेवण्यात येतो. मात्र, एकाच नंबरसाठी दोन वाहनधारकांचे धनादेश आल्यास त्यातील सर्वाधिक रकमेचा धनादेश देणाऱ्याला तो नंबरदिला जातो.
यासाठी आरटीओ कार्यालयात लिलाव पद्धत देखील आहे. आरटीओच्या या चॉइस नंबर प्रक्रियेतून परिवहन विभागाला प्रचंड प्रमाणात महसूल प्राप्त होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
...अशी झाली महसुलात वाढ
सन 2023-24 या आर्थिक वर्षात आरटीओ कार्यालयाला एकूण 44 कोटी 77 लाख 10 हजार रुपये महसूल मिळाला. यासाठी 52 हजार 473 जणांनी अर्ज केले होते. सन 2024-25 म्हणजे यंदा यात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महसूल 15 कोटींनी वाढला असून, 59 कोटी 36 लाख 92 हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याची नोंद आरटीओत आहे.
अशी झाली बीएच सीरिजच्या नंबरची विक्री
आर्थिक वर्ष- 2023-24
मोटारसायकल - 2 हजार 418
चारचाकी - 4 हजार 846
आर्थिक वर्ष 2024-25
मोटारसायकल - 1 हजार 320
चारचाकी - 2 हजार 635आर्थिक वर्ष 2023-24
मोटारसायकल - 2 हजार 418
चारचाकी - 4 हजार 846
आर्थिक वर्ष 2024-25
मोटारसायकल - 1 हजार 320
चारचाकी - 2 हजार 635आर्थिक वर्ष 2023-24
मोटारसायकल - 2 हजार 418
चारचाकी - 4 हजार 846
आर्थिक वर्ष 2024-25
मोटारसायकल - 1 हजार 320
चारचाकी - 2 हजार 635
चॉइस नंबरच्या माध्यमातून यंदा पुणे आरटीओला 59 कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 15 कोटींची वाढ झाल्याचे समोर आले आहे. चॉइस वाहन क्रमांकाला मागणी अधिक असल्याचे दिसते.- स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे