पुणे

पुणे : आरटीई प्रवेशाचे ‘एसएमएस’ उद्या

अमृता चौगुले

पुणे : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेशासाठी कोणती शाळा मिळाली, याबाबतचे 'एसएमएस' बुधवारी (दि. 12) दुपारी 4 वाजल्यानंतर पाठविण्यात येणार असल्याचे आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात पुण्यातील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिलीसाठी 72 जागांची प्रवेश क्षमता असून, यासाठी सर्वाधिक 3 हजार 608 अर्ज प्राप्त झाले. पुणे जिल्ह्यात 936 शाळांमधील 15 हजार 655 प्रवेशाच्या जागांसाठी सर्वाधिक 77 हजार 531 अर्ज दाखल झाले. तर, सिंधुदुर्गमध्ये 49 शाळांमधील 287 प्रवेशाच्या जागांसाठी 232 एवढे सर्वांत कमी अर्ज प्राप्त झाले आहेत. आता पालकांना प्रवेशाचे एसएमएस येण्याची उत्सुकता आहे.

पालकांनो, इकडे लक्ष द्या…
निवड यादीत स्थान मिळविलेल्या बालकांच्या पालकांनी दि. 13 ते 25 एप्रिलपर्यंत महापालिका, पंचायत समिती स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करावी. ज्या बालकांची प्रवेश प्रक्रियेत निवड होईल, त्या बालकांच्या पालकांना 30 एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष शाळांमध्ये जावून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करता येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT