पुणे

Lok sabha Election 2024 Results : ‘बच्चा बडा हो गया!’ सुप्रिया सुळेंच्या निर्णायक विजयावर रोहित पवारांचे ट्विट

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: बारामती लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या निर्णायक आघाडी घेताना दिसत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार (अजित पवार गट) सुनेत्रा पवार या सुरवातीपासूनच पिछाडीवर असलेल्या बघायला मिळाल्या. सुळेंच्या निर्णायक विजयावर आमदार रोहित पवार यांनी X पोस्ट करत अजित पवारांवर टीका केला आहे.

 नेता बनण्याची नाही, तर राजकारण सुधारण्याची घाई

रोहीत पवार यांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे की, "काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झालीय; पण त्यांना सांगायचंय की, नेता बनण्याची घाई नाही तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलं त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झालीय".

सुप्रियाताईंचं मनापासून अभिनंदन

बारामतीत सुप्रियाताईंचा विजय हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा, सुप्रियाताईंच्या कष्टाचा, मविआचे सर्व पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते यांच्या त्यागाचा आणि दडपशाहीला झुगारलेल्या स्वाभिमानी सामान्य जनतेच्या प्रेमाचा आहे. या दणदणीत विजयाबद्दल सुप्रियाताईंचं मनापासून अभिनंदन!, असेही आमदार रोहित पवार एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT