प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo
पुणे

Rohit Pawar PA daughter death : बारामती हादरली; आमदार रोहित पवार यांच्या PA च्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू

साईनगरमधील धक्‍कादायक घटना, हत्या की जीवन संपवले तपास सुरु

पुढारी वृत्तसेवा

Rohit Pawar PA daughter death : बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर येथून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाच्या (PA) अजित दशावतारेअल्पवयीन मुलीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्‍यान, आमदार रोहित पवार बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल झाले आहेत.

पोलिसांची घटनास्‍थळी धाव

साईनगर भागात मुलीचा मृतदेह मिळून आल्यानंतर स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. हा प्रकार हत्या आहे की मुलीने स्वतःचे जीवन संपवले, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करत पुढील तपास सुरु केला आहे.

आमदार रोहित पवार रुग्णालयाला भेट

आमदार रोहित पवार बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल झाले आहेत. दरम्‍यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्याचा अधिकृत वैद्यकीय व फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके आणि अचूक कारण समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर घटकांची तपासणी करत आहेत.

हत्या की जीवन संपवले तपास सुरु

मुलीच्या शरीरावर जखमा असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुलीला इमारतीवरून फेकून दिले आहे का? मुलीची हत्या करून मुलीचा मृतदेह इमारती बाहेर कुणी आणून टाकला? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT