पुणे

पिंपरी : अष्टविनायक दर्शनाला वल्लभनगर आगारातून प्रतिसाद

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्ताने मंगळवार (दि. 10) रोजीसाठी अष्टविनायक दर्शनासाठी एसटी महामंडळाने नेहमीप्रमाणे बुकिंगची सोय केली. त्यानुसार एसटीच्या बुकिंगला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याने दहा दिवसांपुर्वीच बुकिंग फुल्ल झाले असून, दुसर्‍या ज्यादा बसची सोय प्रवाशांच्या सायीसाठी केली आहे. अष्टविनायक दर्शनासाठी ओझर येथील भक्त निवास येथे मुक्काम करता येणार आहे.

या ठिकाणी उत्तम भोजण आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.हा खर्च प्रवाशांना स्वतः करावा लागणार आहे. संकष्ठी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शनासाठी दरवर्षी गणेशभक्तांच्या रांगा लागतात. शहरातील गणेश भक्तांची अल्पदरात सोय व्हावी, या उद्देशाने आगारामधून बसची सुविधा करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रवाशांना ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. अशी माहिती पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली.

SCROLL FOR NEXT