पुणे

पुणे : वेषांतर करून वास्तव्य करणार्‍याला अटक

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर वार करून खुनाचा प्रयत्न करीत दोन वर्षांपासून वेषांतर करून कर्नाटक आणि काही दिवसांपासून येरवड्यात राहत असलेल्या फरार असलेल्या मुख्य आरोपीला युनिट चारने अटक केली. संबंधित आरोपी वेषांतर करून मांस विक्रीच्या दुकानात काम करीत असल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना मे 2021 मध्ये लोहगावमधील साठेवस्ती परिसरात घडली होती. जमीर रफिक शेख (वय 22, रा. जय प्रकाशनगर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

तरुणावर खुनी हल्ला करून फरार झालेला मुख्य आरोपी जमीर शेख हा चिकन विक्रीच्या दुकानात कामाला असल्याची माहिती पोलिस नाईक विनोद महाजन यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून शिताफीने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा केल्यापासून पुण्यातून पळून जाऊन कर्नाटकात वेषांतर करून राहत असल्याची कबुली दिली. त्यानंतर तो येरवड्यातील लक्ष्मीनगरमध्ये चिकनच्या दुकानात काम करत होता. पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार महेंद्र पवार, पोलिस अंमलदार संजय आढारी, विनोद महाजन, स्वप्निल कांबळे यांच्या पथकाने त्याला अटक केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT