पुणे

येरवडा : कोंडीतून नागरिकांची सुटका करा; आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रशासनाला सूचना

अमृता चौगुले

येरवडा; पुढारी वृत्तसेवा: गेल्या काही महिन्यांपासून धानोरी, लोहगाव पोरवाल रोड व फाइव्ह-नाइन परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची सूचना वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी प्रशासनाला दिली आहे.

धानोरी सिटी हॉस्पिटल ते फाइव्ह -नाइन रस्त्याचे प्रलंबित काम, धानोरी जकातनाका ते मारथोफिलस शाळा रस्त्यासाठी भू-संपादन, तसेच लोहगाव पोरवाल रोड येथील कमलाई चौकातून ऑर्चिड हॉस्पिटल येथील पर्यायी रस्त्याच्या अपूर्ण कामाची पाहणी मंगळवारी (दि. 20) करण्यात आली.

या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रस्ते विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते. या वेळी रस्त्यांच्या समस्यांबाबत टिंगरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रत्यक्ष काम करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा व अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

या पाहणीनंतर प्रशासनाने तातडीले पावले उचलली असून धानोरी जकातनाका ते मारथोफिलस शाळा रस्त्यासाठी भूसंपादन करण्यासाठी मारथोफिलस शाळा प्रशासनास पत्र पाठवले आहे. तसेच यासंदर्भात येत्या 27 सप्टेंबर रोजी बैठकीचेही आयोजनदेखील केले आहे.

SCROLL FOR NEXT