मातामृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज होणार सादर; पुढील दोन दिवसांमध्ये ठरणार कारवाईची दिशा Pudhari
पुणे

मातामृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज होणार सादर; पुढील दोन दिवसांमध्ये ठरणार कारवाईची दिशा

तिन्ही समित्यांचे अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील दोन दिवसांमध्ये कारवाईची दिशा ठरणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार नाकारण्यात आलेल्या महिलेच्या नातेवाइकांचे जबाब बुधवारी (दि.9) मातामृत्यू अन्वेषण समितीने नोंदवून घेतले. अंतिम अहवाल आज शुक्रवारी (दि.11) सादर केला जाणार आहे. तिन्ही समित्यांचे अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील दोन दिवसांमध्ये कारवाईची दिशा ठरणार आहे.

रुग्णाच्या नातेवासकांचे जबाब नोंदवता न आल्याने मातामृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल प्रलंबित होता. बुधवारी समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांनी त्यांचे जबाब नोंदवून घेतले. भिसे यांच्या कुटुंबीयांनीही समितीला तिच्या आरोग्याशी संबंधित कागदपत्रे दिली. 37 वर्षीय तनिषा ऊर्फ ईश्वरी सुशांत भिसे यांच्या प्रसूतीनंतर मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यात नातेवाइकांचा जबाब महत्त्वाची भूमिका बजावेल, असे समितीच्या सदस्यांकडून सांगण्यात आले.

समितीच्या अध्यक्षा डॉ. निना बोराडे म्हणाल्या, आम्ही महिलेच्या कुटुंबीयांना सोमवारी (दि.7) भेटलो. मात्र, तणावाखाली असल्याने ते बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांची बुधवारी भेट घेतली. रुग्णालयाने महिलेची वैद्यकीय पार्श्वभूमी आणि गोपनीय माहिती खुली केल्याने नातेवाइकांनी आक्षेप घेतला आहे.

महिलेवर उपचार झालेल्या तिन्ही रुग्णालयांमधून आणि आयव्हीएफ उपचार घेतलेल्या रुग्णालयामधून समितीतर्फे सर्व कागदपत्रे संकलित करण्यात आली. ज्या रुग्णालयांमध्ये तिने प्रसूतीपूर्व उपचार घेतले त्या रुग्णालयांशीही संपर्क साधण्यात आला. त्यानंतर, कमला नेहरू रुग्णालयात बैठक पार पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT