पुणे

पुणे : केलेल्या कारवाईचा आठवड्यात अहवाल द्या; आयुक्तांचा आकाशचिन्ह विभागाला आदेश

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात सर्वत्र अनधिकृत जाहिरातबाजीचे पेव फुटले असताना महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून कारवाई होताना दिसत नाही. प्रशासनाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करीत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या विभागाला कार्यवाहीचा आठवड्यात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच कार्यवाही न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. महापालिका हद्दीत फ्लेक्स किंवा होर्डिंग उभे करण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून सशुल्क परवानगी दिली जाते. मात्र, महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता शहरातील राजकीय पक्ष, स्थानिक नेते, कार्यकर्ते-पदाधिकारी यांच्याप्रमाणेच विविध स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्था आदींकडून शहरात अनधिकृतपणे जाहिरात बाजी केली जाते.

यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होतेच, त्याशिवाय शहराचे विद्रूपीकरणसुद्धा होते. 'जी-20' आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरात कारवाई मोहीम राबविली. मात्र, त्यानंतर कारवाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. रस्त्यांवर आणि चौकाचौकांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स उभे करण्यात आले आहेत. यामुळे विक्रम कुमार यांनी आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कारवाईचा अहवाल आठवड्यात देण्याचा आदेश दिला आहे. कार्यवाही न करणार्‍यांवर कारवाईचाही आदेश दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT