वारजे पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण; लवकरच पाणीपुरवठा होणार सुरळीत pudhari
पुणे

वारजे पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण; लवकरच पाणीपुरवठा होणार सुरळीत

या कालावधीमध्ये आवश्यक तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: खडकवासला येथून वारजे जलशुद्धीकरण प्रकल्पास रॉ वॉटर (प्रक्रिया न केलेले पाणी) पुरविणारी 1,600 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वारजे येथे फुटली होती. त्यामुळे मंगळवारी शहराच्या पश्चिम भागाचा पाणीपुरवठा बंद होता. अचानक पाणी बंद राहणार असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.

आज या जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उद्या बुधवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

खडकवासला धरणातून वारजे जलशुद्धीकरण केंद्रास पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी वारजे येथील पंधरा दिवसांपूर्वी फुटली होती. त्यानंतर रविवारी पहाटे पुन्हा वारजे पोलिस चौकीजवळ 1600 मी. मी. व्यासाची जलवाहिनी फुटली होती.

त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले. या जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम सोमवारी रात्री हाती घेतले गेले. त्यामुळे मंगळवारी वारजे, शिवणे इंडस्ट्रीयल एरिया, कर्वेनगर, शिवाजीनगर, गोखलेनगर, भोसले नगर, पाषाण, बाणेर, बालेवाडी, कोथरूड व खडकीचा काही भाग येथील पाणीपुरवठा बंद होता. या कालावधीमध्ये आवश्यक तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT