पौड, पुढारी वृत्तसेवा: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भूगाव ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून 66 केसरी शिधापत्रिकाधारकांना अल्प दरात रेशनिंग धान्य वाटप करण्यात आले. तहसीलदार अभय चव्हाण, गटविकास अधिकारी संदीप जठार, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या उपस्थित या उपक्रमास शुभारंभ करण्यात आला. गावातील गरीब कुटुंबासाठी योगदान ठरणारी ही योजना माजी सरपंच निकिता सनस यांच्या पुढाकाराने सरपंच वनिता तांगडे व ग्रामपंचायत सदस्यांनी राबविली आहे. या अंतर्गत एक महिन्याच्या आत 66 गरीब कुटुंबांना कमी दरात धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या वेळी शांताराम इंगवले, शंकर मांडेकर, उपसरपंच योगेश चोंधे, राहुल शेडगे, विशाल चोंधे, विशाल भिलारे,सदस्य दिनेश सुर्वे, कालिदास शेडगे, संकेत कांबळे, अर्चना सुर्वे, वैशाली महेश सणस आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी मदन शेलार यांनी केले.