पुणे

पुणे : साडेसतरानळीत राष्ट्रवादीची ताकद मोडण्याचे आव्हान

अमृता चौगुले

प्रमोद गिरी

हडपसर : साडेसतरानळी गाव सीरम कंपनी पूनावाला ग्रुप व अमनोरा टाऊनशिपमुळे चर्चिले जाते. या गावचा बर्‍याचसा भाग टाऊनशिपमधे गेला आहे. हा नवीन प्रभाग साडेसतरानळी -आकाशवाणी प्रभाग क्रमांक 23 असून, याठिकाणी राष्ट्रवादी पक्षाची ताकद मजबूत आहे. मात्र, भाजपही या ठिकाणी तगडे उमेदवार देऊन नव्या प्रभागात प्रवेश करेल, अशी अपेक्षा आहे.

Ward 23

या भागाला आकाशवाणी 15 नंबर परिसर सीरम इन्स्टिट्यूटपर्यंतचा प्रभाग क्र. 22 मधील बर्‍याचसा भाग जोडला आहे.साडेसतरानळी व केशवनगर मांजरी बुद्रुकचा काहीसा भाग या नव्या प्रभागात येतो. या भागात गेल्या पाच वर्षांत पालिकेच्या लोकप्रतिनिधी यांनी लक्ष दिलेले नाही. या भागात पिण्याचे पाण्याचा प्रश्न, कचरा निर्मूलन व कॅनॉलमधे कचराचे साम—ाज्य यामुळे पंधरा नंबर परिसरात मच्छर व घाणीचे वातावरणात नागरिकांना राहावे लागते.

गंभीर नागरी प्रश्न आहे तसेच कायम

केशनवनगर भागात वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकामे व अनियोजित पाणी आदी प्रश्न गंभीर आहेत.प्रभागात अमनोरा सिटीमधे सुशिक्षित मतदार आहेत. विशेषत: परराज्यातील अधिक आहे. सीरम कंपनीतील कामगार या प्रभागात ब-यापैकी राहतो.
या ठिकाणी प्रभाग क्रमांक 22 मधील आकाशवाणी पंधरा लक्ष्मी कॉलनी मुंढवा कीर्तने बाग, महादेवनगर हा भाग नवीन प्रभाग 23 मधे समाविष्ट केला आहे. या प्रभागात मराठा कुणबी वर्ग जास्त आहे. त्या तोडीला इतरही मिश्र जाती धर्माचा वर्ग मोठ्या प्रामाणावर आहे. सक्षम व जनसंपर्क व सामाजिक विकास कामाची दृष्टी असणार्‍यांना प्राधान्य मतदार देतील का, हे पाहावे लागेल.

राष्ट्रवादीतून प्रवीण तुपे, संदीपनाना तुपे, अमरआबा तुपे, प्रशांत पवार, जितीन कांबळे, संजीवनी जाधव, विक्रम जाधव ही नावे इच्छुक आहेत. भाजपमधून भूषण तुपे, डॉ. कुमार कोद्रे, संदीप लोणकर, अण्णा धारवाडकर, डॉ. दादा कोद्रे, सुनील धुमाळ, विराज तुपे, वंदना कोद्रे आदी इच्छुक दिसतात. काँग्रेस आयमधून दिलीप शंकर तुपे, रमेश राऊत, सीमा राऊत, बाळासाहेब टिळेकर आदी तर इतरांमध्ये इंद्रजित तुपे व अन्य नावे आहेत. शिवसेनेतून दिलीप व्यवहारे, समीरअण्णा तुपे, सुवर्णा जगताप, अजय जाधव, विक्रम लोणकर, राणी प्रकाश नवले हे इच्छुक आहेत. या प्रभागात साडेसतरानळी व परिसरात पाणी, कचरी व वाहतुकीचा प्रश्न आहेच. या नव्या उमेदवारांपुढे मोठे आव्हान आहे. या ठिकाणी पक्षात कोणाला संधी मिळेल, त्यातच ओबीसी आरक्षण, यावर सर्व अवलंबून आहे.

अशी आहे प्रभागरचना

साडेसतरानळी, आकाशवाणी, कोद्रेनगर, शंकरनगर, तुपणीवस्ती, अ‍ॅमनोरा मॉल, मार्वेल ऑर्को, सुकून व्हिलेज, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हेलिपॅड, सुभाषनगर, महादेवनगर, अमरसृष्टी, लक्ष्मी पार्क कॉलनी, चंदननगर, राजश्री शाहू सोसायटी, केशवनगर, कल्पतरू सेरेनिटी, मांजरी ग्रामपंचायत, माळवाडी, हडपसर, किर्तनेबाग इत्यादी मिळून हा प्रभाग तयार झाला आहे.

  • प्रभागातील लोकसंख्या- 55659
  • अनुसूचित जाती- 6395
  • अनुसूचित जमाती- 726

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT