पाळीव म्हशीला रानगव्याप्रमाणे रेडकू जन्मला Pudhari
पुणे

Rare Hybrid Calf: पाळीव म्हशीला रानगव्याप्रमाणे रेडकू जन्मला

भोर तालुक्यातील रायरेश्वर गडावर दुर्मीळ जैविक घटना; DNA तपासणीनंतरच निष्कर्ष

पुढारी वृत्तसेवा

भोर : पाळीव म्हशीला रानगव्यापासून रेडकू झाल्याची घटना भोर तालुक्यातील रायरेश्वर गडावरील शेतकरी सुरेश वाघमारे यांच्या जनावरांच्या गोठ्यात घडली आहे. डीएनए तपासणी व रक्त परीक्षण केल्यानंतरच रेडकू रानगव्याचे आहे का, हे निष्पन्न होणार असल्याचे वन विभागाचे वनपाल रोहन इंगवले यांनी सांगितले.(Latest Pune News)

वाघमारे कुटुंबाच्या पाळीव म्हशीने जन्म दिलेले रेडकू हे म्हशीसारखे नसून त्याचे स्वरूप रानगव्याप्रमाणे आहे. शरीराचा रंग काळा आणि पांढरा मिश्रित, मजबूत अंगकाठी, डोक्यावरील रचना व डोळ्यांतील चमक पाहून हे रेडकू रानगव्याशी साम्य असल्याचे स्पष्ट होते. पुणे जिल्ह्यातील ही केवळ दुसरीच घटना असून यापूर्वी अशीच एक घटना मुळशी तालुक्यातील पुण्यानजीकच्या सुस बावधन भागात घडली होती.

पाळीव म्हैस व रानगव्याच्या संकरातून जन्मलेले रेडकू म्हणजे एक अत्यंत दुर्मीळ जैविक घटना आहे. अशा संकरातून जन्मलेल्या पिल्ल्यांच्या वाढीमान, प्रजननक्षमता आणि भविष्यातील अस्तित्वाबाबत नेहमीच शास्त्रीय शंका निर्माण होत असते.

रायरेश्वर येथे पाळीव म्हशीला जन्मलेले रानगव्यासारखे रेडकू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT